ABVHMC Desk of Chairman
Prashant Desarda
Former Deputy Mayor,
District Vice President BJP Sambhajinagar
मी होमिओपॅथीक कॉलेज का चालू केले?
स्व. डॉ. शांतीलालजी मोतीलालजी देसरडा यांनी अतिशय सामान्य कुटुंबातील सदस्य असतानाही आपली दैदिप्यमान कामगिरी दाखवत १९७७ मध्ये सुवर्ण पदक पटकावून परिवारात पहिला डॉक्टर होण्याचा मान मिळविला.
त्यानंतर भगवान होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक ते उपप्राचार्य या ८ वर्षांच्या प्रवासात सरांनी होमिओपॅथीचे सर्व धडे गिरविले.
जैन गुरुवर्य मिश्रीलालजी म.सा. चा आशीर्वाद, प्रेरणा आणि त्यांचा विश्वास सार्थ ठरवत गुरुगणेश नगर, औरंगाबाद येथे १९८९ मध्ये DKMM होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची सुरुवात केली.
DKMM कॉलेज चालवत असताना आपल्या ज्ञानाचा उपयोग आता फक्त DKMM परिवारापुरता न ठेवता होमिओपॅथी शिक्षण क्षेत्रात काम चालू करावे असा मानस त्यांनी केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, केंद्रीय होमिओपॅथी परिषद नवी दिल्ली, आयुष मंत्रालय भारत सरकार या विविध पदांवर काम करताना या महाराष्ट्राच्या भूमीपुत्राने संपूर्ण भारताच्या होमिओपॅथी परिवारामध्ये, वेळ पडल्यास संयमाने, कधी आक्रमक भूमिकेने तर कधी चाणक्यनीतीचा उत्तम उपयोग करून होमिओपॅथीच्या अंतर्गत असणारे सर्व शिक्षकवृंद, वैद्यकीय सेवा करणारे विद्यार्थी यांचे असंख्य प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
हे सर्व कार्य करत असताना भारतातील होमिओपॅथी परिवार DKMM कॉलेज या संस्थांसाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावले. हा संपूर्ण वेळ आणि त्याची क्षमता जर त्यांनी आपल्या स्वतःच्या संस्थेत पूर्ण वेळ लावली असती, तर महाराष्ट्रातील नावारूपाला आलेल्या संस्थांच्या यादीत त्यांची संस्था राहिली असती. शेलगाव येथे “ओम शांती बहुद्देशीय शिक्षण संस्था” अंतर्गत गुरुमिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज नव्याने सुरु केले, जे सरांच्या अथक परिश्रमाने भारतातील सर्वात जास्त MD च्या सीट असणाऱ्या कॉलेजमध्ये गणले जाते.
मी स्वतःला भाग्यवान समजतो की, सरांनी माझ्या राजकीय वाटचालीबरोबर होमिओपॅथिक शैक्षणिक क्षेत्रात आणि गरजू रुग्णांच्या सेवेत भरीव योगदान होईल, अशी दूरदृष्टी ठेवून “ओम शांती बहुद्देशीय शिक्षण संस्था” अंतर्गत मला अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना करण्याची संधी दिली. ही माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. बघता बघता सर होमिओपॅथीचे आदरणीय व्यक्तिमत्व झाले. MUHS असो किंवा CCH, सरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही पाऊल टाकले जात नव्हते. प्राध्यापक ते CCH चे एक्झिक्युटिव्ह मेंबर ही संघर्ष यात्रा अविरत चालू ठेवली.
कष्टातून जीवन फुलविले | उरली नाही साठ आम्हाला || आठवण येते क्षणाक्षणाला | आजही तुमची वाट पाहतो || यावे पुन्हा जन्माला | अशा या वीर क्रांतिकारी पुरुषांच्या सगळ्याच आठवणी माझ्या मनाच्या मखमली पेटीत सदैव स्मरणात राहतील व त्यांनी केलेल्या कार्याला माझा मानाचा मुजरा! मरणोत्तर डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक गौरव!